सोमवारपासून वातावरणात छान बदल झाला असून लंडनकर आतुरतेने वाट पहात असणारे सनी डेज आले आहेत. ऑलिंपिकच्या आयोजकांचा जीव त्यामुळे नक्कीच भांड्यात पडला असेल. चांगल्या दिवसांचे स्वागत करायला वीकएंडलाच बाहेर पडून खास समर शॉपिंगसाठी बाजारात झुंबड उडालेली दिसली. सध्या लंडनच्या बाजारपेठाही ऑलिंपिकमय झाल्या आहेत. ब्रँडेड स्टोअर्सपासून रस्त्यावरच्या मार्केटपर्यंत सगळीकडे ऑलिंपिकच्या वस्तू विकायला ठेवलेल्या दिसताहेत. टीशर्ट, मग, पिशव्या, पर्स, सॅक एवढेच नाही तर चपला, घड्याळे, टॉवेल अगदी चादरीसुद्धा ऑलिंपिकच्या रंगात रंगलेल्या दिसत आहेत.
लंडन २०१२ या ऑलिंपिक आयोजकांच्या अधिकृत संकेतस्थळावरूनसुद्धा या ब्रँडेड ऑलिंपिक वस्तूंची विक्री होत आहे. अर्थातच या सर्व वस्तू नेहमीपेक्षा थोड्या जास्त दरानेच विकण्यात येत आहेत. टी-शर्टची कमीत कमी किंमत २० पाउंड तर स्वस्तातल्या टोपीसाठीही १० पाउंड मोजावे लागताहेत. या विक्रीतून जमणारा निधी चॅरिटीसाठी देण्याचा बेत आहे.
![]() |
| छायाचित्रे - सोनाली पटवर्धन भोसले |
![]() |
| Add caption |
ऑलिंपिक स्पर्धा या मेगा इव्हेंट म्हणून ‘साजऱ्या’ होतात. त्यामुळे त्याबरोबर मार्केटिंग आणि बिझनेस या गोष्टी येणारच. लंडनसारख्या जागतिक शहरात, कॉस्मोपॉलिटन वातावरणात यंदा ऑलिंपिक होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगची जाहिरातबाजी शिगेला पोचली आहे. ऑलिंपिक नियोजन समितीने स्वतःच्या प्रत्येक प्रकाशनामध्ये स्पॉन्सरर्सचे भरभरून आभार मानत जमेल तिथे जाहिरात करू दिली आहे.
आयोजनासाठी लागलेला कित्येक कोटींचा निधी या जाहिरातींतून, प्रायोजकांकडून आला आहे. कोकाकोला, आदिदास, मॅकडोनल्ड यांसारखे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले ब्रँड यंदाच्या ऑलिंपिकचे प्रमुख प्रायोजक आहेत. ऑलिंपिक नियोजन समितीने या प्रायोजकांना खुष ठेवण्यासाठी या ब्रँडखेरीज इतर वस्तू (विशेषतः प्रतिस्पर्धी ब्रँडच्या) ऑलिंपिक व्हेन्यूच्या आसपास विक्रीसाठी ठेवण्यास बंदी घातली आहे.
आयोजनासाठी लागलेला कित्येक कोटींचा निधी या जाहिरातींतून, प्रायोजकांकडून आला आहे. कोकाकोला, आदिदास, मॅकडोनल्ड यांसारखे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले ब्रँड यंदाच्या ऑलिंपिकचे प्रमुख प्रायोजक आहेत. ऑलिंपिक नियोजन समितीने या प्रायोजकांना खुष ठेवण्यासाठी या ब्रँडखेरीज इतर वस्तू (विशेषतः प्रतिस्पर्धी ब्रँडच्या) ऑलिंपिक व्हेन्यूच्या आसपास विक्रीसाठी ठेवण्यास बंदी घातली आहे.
यासंदर्भात परवा बीबीसीवर दाखवलेली व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्याची मुलाखत खूपच गाजली. प्रेक्षकांपैकी कुणी पेप्सी असे लिहिलेला टी- शर्ट घालून आले तर ऑलिंपिक स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगताच उलट- सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. नायकीचे शूज घालून जाणाऱ्यांना अडवणार का? प्रायोजकांखेरीज वेगळ्या ब्रँडचे वेफर्स नेले तर पाकिटासह ते आत नेले जाऊ देणार नाही, प्रायोजकांखेरीज इतर ब्रँडची बिअर किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यास मनाई वगैरे चर्चा रंगली शेवटी ऑलिंपिक आयोजकांना याविषयी जाहीर खुलासा करावा लागला. जमावाने येणाऱ्या प्रेक्षकांनी दिसून येईल अशा प्रमाणात प्रतिस्पर्धी ब्रँडचा वापर केला तर त्यावर बंदी घालण्यात येईल. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ दिली जाणार नाही, असे शेवटी उघड करण्यात आले.


No comments:
Post a Comment